अनंताच्या प्रवासाला निघालेल्या प्रीय मीञा .......
![]() |
| Banty |
आतावरच्या सगळ्यात दूरच्या प्रवासाला तू एकटाच निघालास ,ऊशीर झाला लीहायला ,खूप बोलायच होत ,खूप हसायच होत ,खूप मोठा वादविवाद घालायचा होता ,पण तू अलगदपणे निघून गेलास ,,,,पूण्याच्या वैकूंठ भूमीत तूला तूझी हक्काची जागा मीळाली ,आणी मानवदेह त्यागून तू आता ...दिगंताच्या प्रवासाला निघालास ,सगळ काही भकास करून ,तू ऊभा केलेला मीञपरीवार जणमाणसातला तूझा परीवार तूझ्या जाण्याने दूखी: झालाय ,पण त्या हरामखोर नियतीचे फास कोनीच ऊलटवू शकत नाही ....आधीच ऊनपूर अन्यायग्रस्त शरीर तूझ्या वाट्याला आल ,तू त्याचा कधीच बाऊ नाही केला ,गेल्या तिन इयरमधली जगण्याची स्वच्छंदता ,बेधूंद होवून दरवळलास आणी अशाच एका पाहटेच्या वेळेस हीरमसून गेलास तो कायमचा
मन भूतकाळाचा शोध घेवू लागत ,लख्ख प्रकाश डोक्यात पडतो 2008 साल आठवत आणी अशाच आँक्टोबर महीन्यात 2 आँक्टोबरला डीएड काँलेजला वैभव बरोबर एक कँलेडंर टाइप तेरे नाम स्टाईल करत तू सगळ्यांचा आवडता बंटी झालास काँलेजचे दिवस म्हणजे तूझ्या माझ्या आयूष्यातला गोल्डन काळ म्हणायला हरकत नसावी ,,,,,महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेली आजची आपली घट्ट मीञमंडळी , मदीरामंडळ असेल ,साईछञग्रूप असेल .सगळ्यात समरसून जगलास मीञा ,कदम बाईंचा लाडका स्टूंडंट ते कल्चरल इह्वेंटचा बेताज बादशहा होतास ,आपण गाजवलेली पथनाट्य ,डान्स ,,,कींवा शाळेचा परीपाठ....कीतीतरी मन लावून रमलास मीञा ,,,काँलेजची सूट्टी आपल्याला जीवघेनी वाटायची ...होस्टेल डेज तर होस्टेलचा एकही मूलगा विसरू शकत नाही ,,,,तूला आठवतय आशपाकची गहन चचाॆ असेल कींवा आपण केलेला होळीचा सेकंड इयरचा राडा असेल ...वैभव बरोबरची तूझी केमीस्ट्री कूनाच्या बापाला सूटली नाही ,,,अमोल काळेची मस्ती गणप्याचा कलंदरपणा , उमेश गोसावी असल्यावर आपली रूम भरगच्च दिसायची ...होस्टेलची शान माञ तूझ्यामूळेच असायची
खूप घट्ट मैञी चे मूळ याच काळात रोवली गेली
काँलेज संपल्यानंतर प्रत्येकजण आयूष्याच्या नव्या वाटांवर स्वार झाले ....हळहळू रूळलेली मैञी सैल होते की काय अस वाटत असताना फेसबूक ह्वाटसपच्या जगाने आपल्याला खूप जवळ आनून सोडल ......पण आपली यारी त्यापलीक़डे होती ,प्रत्येक इयरला आपण कोनाच्याना कोनाच्या घरी जमायचो चार दिवस एकञ घासून पून्हा नव्या दमाने जगाशी चार हात करायचो ....
हळूहळू दिवस पालटत होते ,सूख दूखा:च्या मैफीली झडायच्या ,पून्हा जूने सोनेरी दिवस आठवायचो ,मनातल्या मनात पून्हा काँलेज लाईफ जगायचो
अचानक साल 2018 -19 असाव ,ऩेहमीच आठवड्याला काँल करनार्या वैभव मैडला तू तूझ्या दोन्ही कीडन्या निकामी झाल्याची बातमी दिली , आणी सूरू झाला तेथूनच तूझ्या बेधूंद कलंदर जगण्याचा प्रवास , कदाचीत तूलाही कळल असाव ...बंदे के पास टाईम बहोत कम है ,,,तूझ्या आजाराची बातमी वैभवकडून कळाल्यावर विश्वासच बसला नाही , पण चला मीळेल एखादी कीडणी लवकर याच आशेवर वैभव आणी बाब्यान मूंबईंतली हाँस्पीटल पालथी घातली ,पण तू बेधूंद जगलास ..
कोवीड आला पहील्या वेळेला तू सहीसलामत बाहेर आलास ....त्यावेळेला नगरमधे ऊमेश आणी अशोकने तूझी खूप काळजी घेतली .....ज्याच्या त्याच्या परीने जमेल तसी मदत आपण मीञांनी गोळा करत फंड ही गोळा केला ,,,,त्यात 20 रू ची मदत करनारा 4थी चा ही मूबंईतला मूलगाही होता कीतीतरी तूला मला न ओळखनार्यांनी जमेल ती मदत पाठवली ....
सावरलय अस वाटत असताना
कालच्या एप्रील महीन्यात तू आणी वैभव नेहमीप्रमाने शेवगाव ला आलात आपली ती शेवटची भेट ....अमरापूरला नाथाच्या घरी भेट देवून आपण राञी बाभूळगावला आलो .....तेच ते दोन तीन दिवस आपण बेधूंद जगलो ....जस काही तूला माहीत होत बापू पून्हा या जन्मात पूऩ्हा भेट नाही ,,,,आपली शेततळ्यावरची मेजवानी ही आता दिवास्वप्न च राहीली .....😭
तूझ्या जगण्याला सलाम करवासा वाटतो .तूझ आजारपण आणी वेदना जवळून पाहील्यात मी बसून झोपताना पाहील्यावर आजही प्रसंग आठवल्यावर डोऴे ओले होतात मीञा ,,,तू लढत राहीलास ,जिकंत राहीलास एकेक दिवस ,डायलीसीस खरच कीती वेदनादायी असत हे तूझ्या रूपात पाहीलय जवळून मी .....तरीही तू म्हणायचास वैभव ....मला खूप दिवस जगायचरे ...इतक्यात नाही जानार मी .......डोळ्याच्या धारा कधीच महापूरात बूडायच्या रे ......ती तूझी जगण्याची धडपड पाहून
जवळजवळ सगळ्याच मींञांचे काँल यायचे त्यात तूझा विषय असायचा
..प्रत्येकजण हळहळायचा रे ..काहींची हींमत नाही झाली..तूला आजारी असताना पाहण्याची
चालत फीरत शेवटची भेट दिवून गेलास एप्रीलमधे ...आपण ठरवल होत पूऩ्हा लवकर भेटायच पण ......पायच साथ देईनासे झाल्यावर माञ मन सैरभैर झाल मधल्या काळात ह्वीडीयोकाँलवर बोललो आपण आवाज खोल गेलेला ,वजन कमी होत असताना ,डगमगला नाहीस
सामोर गेलास त्या वेदनांना ,व काबूत करत हसत राहीलास अखेरच्या श्वासापयॆतं ....नमवत राहीलास नीयतीला ...पण ती आज जींकली ....आणी तू अखेरच्या प्रवासाला निघालास .....आता तूला थांब कसा म्हणू रे .....म्हणून तूझ्या अनंताच्या प्रवासाला तू निघाला असताना ....वेदनेच्या प्रवासातून सूटलास ..येवढाच तो काय मनाला विसावा
....बाकी खूप काही आहे बारक्या ....
ते नंतर कधीतरी आपण दोघ बोलू ...
नेहमीच आठवनीत राहण्यासाठी जरा वरतून चमकत रहा ....
तूझाच मीञ
बापू 😭

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा