माहिती संकलन,- राजे भोसले साहेबांचे सत्काराचे भाषण) (लेखन-देवीलाल घनवट)

 


सहकार क्षेत्रातील शेवगाव तालुक्यातील गावात विविध योजनांची चळवळ उभी करणारा वारकरी सतीश राजे भोसले साहेब, दिनांक 30 जून 2022 आपल्या दीर्घ सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात सत्कार समारंभाला उत्तर देताना राजे भोसले साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले, राजे भोसले यांची जन्मगाव शेवगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेली मुंगी हे गाव घरची 65 एकर शेती असताना सुद्धा पाणी अभावी शेती करताना अत्यल्प उत्पन्नावर घरचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नव्हता हे सांगताना राजे भोसले.....


 साहेबांनी ६५ एकर शेती असणाऱ्या बापाच्या पायात चप्पल नव्हती हे पाहिल्यानंतर आपल्या विद्यार्थीदशेतील अखिल भारतीय चळवळीचे काम सोडून आपण आपलं कुटुंब प्रथम सुधारूया मग देश सुधारूया ही कल्पना डोक्यात आणली, गोदावरी नदी गावाजवळ वाहत असल्याने मुंगी गावांमध्ये नदीवरून पहिली पाईपलाईन 1987 मध्ये स्वर्गीय मारुतीराव घुले पाटलांच्या सहकार्याने कर्ज घेऊन  आणली, आज ताजा येत 45 ते 50 एकर शेतीमध्ये ऊस पिकाची एकरी ८० ते ८५ टनाचे एवरेज काढण्याचा विक्रम राजे भोसले साहेबांनी करून दाखवला शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची त्यांचे प्रयत्न सतत चालू असतात आपल्या ज्ञानाचा वापर इतरांनाही व्हावा यासाठी ते नेहमीच सदैव तत्पर असतात लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना गावातील तरुण मुलांनी गावाचा विकास करण्याची ठरवले सुट्ट्यांमध्ये नदीत पोहताना  त्यांनी आपण आपला गाव सुधारूया अशा काही तरुणांची संघटना बनवली होती....


1991 विविध सहकारी सोसायटीमध्ये शेवगाव तालुक्यात अनेक शाखा मध्ये क्लर्क या पदापासून सुरुवात करत बँक शाखा इन्स्पेक्टर या पदापर्यंत मजल मारली असून जनमानसात आपली वेगळीच लोकप्रिय प्रतिमा तयार त्यांनी केली शाखेमधील शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यावर सदैव तत्पर असणारे राजे भोसले साहेब नेहमीच शेतकऱ्यांसाठी सदैव उपलब्ध असायचे नोकरीच्या कार्यकाळात आपण सहकारी सोसायटीला आपले एक पवित्र मंदिर म्हणून त्यांनी आयुष्यभर आपले काम प्रामाणिकपणे करत आल्याचे सांगितले शेतकऱ्यांना  पिक कर्ज तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे यासाठी ते नेहमीच सदैव तत्पर असायचे, राक्षी नजीक बाभूळगाव रावताळे  कुरुडगाव, निमगाव , सोने सांगवी सोसायट्यांचे कामकाज अतिशय उत्कृष्टपणे राजे भोसले साहेबांच्या देखरेखी खाली चालत आले आहे, आपल्या सत्कार समारंभात बोलत असताना गावातील प्रत्येक कार्यकर्त्यांना आपला गाव शांत रहावा यासाठी प्रयत्न करण्याची त्यांनी आवाहन केले, शेतकऱ्यांनी तीन लाखापर्यंतच्या बिनव्याजी पीक कर्जाचा फायदा करून घ्यावा असे सांगताना त्यांनी अहमदनगर जिल्हा बँक सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली कार्यक्रमाला उपस्थित असणारे नजीक बाभूळगाव सोसायटीचे माजी चेअरमन मोहनराव ढोरकुले तसेच कुरुडगाव सोसायटीचे चेअरमन रवी भराट, राक्षी सोसायटीचे चेअरमन श्री कातकडे यांचेही आभार मानले, आपल्या कार्यकाळात कोणाशीही आपले मतभेद कधी झाली नाहीत व सगळ्यांना सांभाळून घेत राक्षी शाखेची भरभराट आज शेवगाव तालुक्यामध्ये करून दाखवली, तसेच राक्षी गावातील  सबनीस काकांची उणीव भासत असल्याचेही सांगितले, सहकार महर्षी मारोतराव घुले यांच्या विचारांच्या पगडा त्यांच्यावर असल्याचे त्यांनी मान्य केले आपल्या कुटुंबातील पाच भावंडांपैकी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संपूर्ण शेती बागायती करून दाखवत प्रगतीची एक मशाल पेटवून दाखवली कुटुंबातील आठ सदस्य सुशिक्षित ग्रॅज्युएट असून उत्तम पैकी सेटल झाल्याचेही सांगितले, सेवानिवृत्तीनंतरही आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कायमच शेतकऱ्यांबरोबर असू या व राहू असे प्रतिपादन केले 2021 पासून अहमदनगर जिल्हा बँकेच्या कामगार संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एका सामान्य कुटुंबातून कामगार संचालक पदापर्यंतची भरारी स्वप्नवत असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच आपल्या सहकार्याविषयी बोलताना श्री दारकुंडे भाऊसाहेब , काळेभाऊसाहेब, कुसळकर भाऊसाहेब तसेच झुंबड भाऊसाहेब यांचे कार्यही उल्लेखनीय असल्याची त्यांनी सांगितले, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नजीक बाभूळगाव चे सरपंच संभाजी राजे घनवट उपसरपंच नामदेव ढोरकुले तसेच ग्रामपंचायत सदस्य दीपक घनवट माजी चेअरमन रोहिदास घनवट विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव घनवट तसेच अर्जुन ढोरकुले व्हाईस चेअरमन, सुभाषराव ढोरकुले, पांडुरंग ढोरकुले,भगवान ढोरकुले, महेश घनवट, देवदान घाडगे नजीक बाभूळगाव ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य राक्षी रावतळे करून निमगाव सोसायटीतील सदस्य ही उपस्थित होते सत्कार समारंभाला उत्तर देत असताना यापुढेही आपण सदैव शेतकऱ्यांबरोबर जोडलेले असू व कामगार संचालक म्हणून आपला कार्यकाळ अतिशय उत्कृष्टपणे सांभाळून दाखवू असे प्रतिपादन केले.. नजीक बाभूळगाव सोसायटीचे सचिव श्री दारकुंडे भाऊसाहेब, कुसळकर भाऊसाहेब यांच्या कार्याचाही गौरव केला


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत रोजगार उपलब्ध .........

𝗪𝗼𝗿𝗸: 𝐓𝐨𝐭𝐚𝐥𝐥𝐲 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐖𝐨𝐫k

विक्रीसाठीछोटा हत्ती आणि बोलेरो प्लस